-
अभिनेत्री तेजश्री प्रधानाची प्रत्येक मालिकेतील भूमिका ही हीट ठरली आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
मग ती जान्हवी असो किंवा शुभ्रा. तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
सध्या तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील तेजश्रीने साकारलेली मुक्ता ही भूमिका प्रेक्षकांना अल्पावधीतच पसंतीस पडली आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करताना दिसत आहे. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
सध्या तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबरचं ‘पंचक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
अलीकडेच तेजश्री प्रधानने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने टीकाकारांना चांगलंच उत्तर दिलं. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्रीला या मुलाखतीमध्ये विचारलं गेलं होतं की, तू टीकेकडे कशी बघतेस? (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
तेजश्री म्हणाली, “मी नाही बघत. सोशल नेटवर्किंग साइट्सवर तुम्ही ज्या प्रतिक्रिया देता त्या प्रतिक्रियेतून आम्ही कोण आहोत? किंवा आम्ही कसे आहोत? हे तुम्ही नाही सांगत. हे तुमच्या आतून येणार आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः काय आहात हे दाखवून देत असता.” (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
पुढे तेजश्री म्हणाली, “म्हणून तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचं आहे बोला, आम्ही ते बघत नाही आणि पाहतही नाही.” (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
“मला येतातच कमेंट. पण त्याच सोशल मीडियावर तुमच्या सर्कलमधली लोक सुद्धा असतात. जे तुम्ही काय लिहिलंय ते वाचतात. ते कोणासाठी लिहिलंय यापेक्षा तुमच्या तोंडून काय शब्द निघतायत ते वाचतात. त्यामुळे स्वतःला छान दर्शवा. बघा जमेल,” असं तेजश्री म्हणाली. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, तेजश्री प्रधानचा ‘पंचक’नंतर ‘लोकशाही’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”