-
पाकिस्तानी क्रिकेटर आणि भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक पुन्हा एकदा बोहल्यावर चढला. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे. (फोटो: @realshoaibmalik/instagram)
-
शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. यासोबतच शोएब आणि सना यांच्यात डेटिंगच्या बातम्याही खूप आधी समोर आल्या होत्या. (फोटो: @realshoaibmalik/instagram)
-
सना जावेदसाठी शोएब मलिकच्या वाढदिवसाच्या पोस्टने डेटिंगच्या अफवांना वाव मिळाला होता. शोएबने गेल्या वर्षी २५ मार्च रोजी सनाच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला होता. (फोटो: @realshoaibmalik/instagram)
-
या फोटोमध्ये सना जावेदसोबत शोएब मलिक दिसत होता. ‘हॅपी बर्थडे बडी!’ असं त्याने फोटोत लिहिलं होतं. (फोटो: @realshoaibmalik/instagram)
-
आता शोएब मलिक आणि त्याची तिसरी पत्नी सना जावेद यांनी २० जानेवारीला त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: @realshoaibmalik/instagram)
-
सना जावेद ही पाकिस्तानी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
(फोटो: @sanajaved.official/instagram) -
सनाने शोएब मलिकशी दुसरं लग्न केलं आहे. यापूर्वी तिने ऑक्टोबर २०२० मध्ये गायक उमेर जसवालशी लग्न केलं होतं, परंतु नोव्हेंबर २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
(फोटो: @sanajaved.official/instagram) -
शोएब मलिकशी लग्न केल्यानंतर सनाने इन्स्टाग्रामवर तिचे नाव बदलून सना शोएब मलिक असे केले आहे.(फोटो: @sanajaved.official/instagram)
-
सना व शोएबच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य