-
Mogalmardini Chatrapati Tararani: मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सोनाली लवकरच ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या बहुप्रतीक्षित चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटात सोनाली छत्रपती ताराराणी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
-
अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी या चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच करण्यात आले.
-
या कार्यक्रमासाठी सोनालीने पांढऱ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
-
पांढऱ्या पैठणी साडीवर सोनालीने मोजके दगिने परिधान केले होते.
-
राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत.
-
प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.
-
हा चित्रपट २२ मार्च रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर