-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब-सहपरिवार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘अंजी’ म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘अबोली’ मालिकेत कोमलची एण्ट्री होणार असून ‘मनवा’ हे पात्र ती साकारणार आहे.
-
मनवाला नाईलाजाने देहविक्रेय व्यवसायात उतरावं लागलं. याविषयी तिच्या मनात सल आहे.
-
अशी वेळ कोणावरही येऊ नये असं तिला वाटतं.
-
अबोलीच्या पुढाकारामुळे मनवाचा शिंदे कुटुंबात प्रवेश होणार का याची उत्सुकता आहे.
-
मनवाचं शिंदे कुटुंबासोबत नेमकं काय नातं आहे हे देखिल मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.
-
‘अबोली’ मालिकेतल्या मनवा पात्राविषयी सांगताना कोमल कुंभार म्हणाली, मी पहिल्यांदाच अश्या प्रकारची भूमिका साकारते आहे.
-
लूकही खूप वेगळा आहे. अंजीप्रमाणेच मनवाही ठसकेबाज आहे.
-
अबोलीच्या कुटुंबाने माझं खूप मनापासून स्वागत केलं आहे.
-
पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत काम करतेय याचाही आनंद आहेच.
-
सहकुटुंब सहपरिवार मधल्या अंजीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे.
-
हेच प्रेम मनवा या भूमिकेलाही मिळेल याची खात्री आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कोमल कुंभार/इन्स्टाग्राम)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही