-
‘बिग बॉस’चं १७वं पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. सध्या या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
अवघ्या काही दिवसांवर ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आहे. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
२८ जानेवारीला संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल सहा तास ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
जसाजसा महाअंतिम सोहळा जवळ येत आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडेचा पती विक्की जैन ‘बिग बॉस’मधून बाहेर झाला. (फोटो सौजन्य – कलर्स टीव्ही)
-
आता ‘बिग बॉस १७’च्या टॉप-५मध्ये मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी आहेत. (फोटो सौजन्य – जिओ सिनेमा इन्स्टाग्राम)
-
या टॉप-५ मधून कोण ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार आहे? याची उत्कंठा आहे. (फोटो सौजन्य – जिओ सिनेमा इन्स्टाग्राम)
-
आता या टॉप-५ सदस्यांना मत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
२८ जानेवारी सकाळी १२ वाजेपर्यंत ही मत देण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
त्यामुळे सध्या टॉप-५मध्ये असलेल्या सदस्यांचे चाहते भरभरून मतं देताना दिसत आहे. तसेच काही कलाकार मंडळी देखील आपल्या आवडत्या सदस्याला मतं देण्यासाठी आवाहन करताना पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
मतांच्या या शर्यतीत कुठला सदस्य आघाडीवर आहे आणि कुठला सदस्य पिछाडीवर आहे? जाणून घ्या… (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, मतांच्या शर्यतीत अभिषेक कुमार व मुनव्वर फारुकी आघाडीवर आहे. (फोटो सौजन्य – अभिषेक कुमार इन्स्टाग्राम)
-
अंकिता लोखंडे व मन्नारा चोप्रा या दोघी तिसऱ्या क्रमांकाच्या जवळ आहेत. दोघींच्या मतांमध्ये थोडा फरक आहे. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
अरुण माशेट्टी हा मतांच्या शर्यतीत पिछाडीवर आहे. पण काही वृत्तांनुसार, मन्नारा व अरुणच्या मतांमध्ये काही मतांचा फरक आहे.
-
आता ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. (फोटो सौजन्य – कलर्स टीव्ही)

Shani Uday 2025 : ६ एप्रिलपासून सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी उदयाने होईल अचानक आर्थिक लाभ