-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी २५ वर्षांचा लीप घेतला. त्यामुळे मालिकेतील बऱ्याच जुन्या पात्रांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील मल्हार हे पात्र एक्झिट झालं. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
अभिनेता कपिल होनरावने मल्हार हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधून कपिलची एक्झिट झाल्यापासून तो कोणत्या नव्या भूमिकेत झळकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
आता लवकरच प्रेक्षकांचा लाडका मल्हार अर्थाच कपिल नव्या भूमिकेतून भेटीस येणार आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
पण कपिल नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
‘सोनी मराठी’ वाहिनीच्या ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत कपिल पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात त्याने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
कपिलने नव्या भूमिकेतील फोटो पोस्ट करून लिहिलं आहे, “परत आलोय तुमचं मनोरंजन करण्यासाठी.” (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
“१७ नोव्हेंबरला मल्हार म्हणून तुमचा निरोप घेतल्यानंतर. पुढे काय? हा प्रश्न होताच. आता आपण लीड रोल करावा हीच मनात, इच्छा ठेवून तशी तयारी करत होतो,” असं कपिल म्हणाला. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर कपिलने लिहिलं, “वर्कआउट , डाएट, मराठी डिक्शन आणि स्वतःवर काम करत होतो. तसं एक दोन जागी लीड म्हणून फायनल झालो ही होतो, पण काही कारणास्तव ते फायनल नाही होऊ शकल.” (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
“असो एक ना दिवस लीड नक्की करेनच आणि सुख मधून निरोप घेतल्यानंतर, तसेच रोल ऑफर होतं होते. जवळपास चार-पाच भूमिकेला नाही, म्हटल्यावर हा रोल ऑफर झाला . एक निगेटिव्ह भूमिका मी कधीच केली नव्हती . म्हणून या भूमिकेला मी लगेच हो म्हणालो,” असं अभिनेत्याने लिहिलं आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
-
शेवटी कपिलने लिहिलं, “मल्हारला प्रेम दिलत तसंच या भूमिकेला पण द्या. तुमचं प्रेम असंच बरोबर असू द्या आणि बघत राहा ‘निवेदिता माझी ताई’” (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास