-
मराठी रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात करत मराठी-हिंदी चित्रपट, मालिका निर्मिती अशा विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केलेले प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (३० जानेवारी) ही घोषणा केली.
-
गेल्या पन्नास वर्षांत कलाकार म्हणून जे काही काम केले ते या पुरस्काराने अधोरेखित झाल्याची भावना अशोक सराफ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
-
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते.
-
या दोघांची लव्हस्टोरी आणि लग्नाचा किस्सा त्याकाळात खूप गाजला होता.
-
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही.
-
अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती.
-
निवेदिता यांच्या वडिलांनी आपल्या मुलीची ओळख अशोक सराफ यांच्याबरोबर करुन दिली होती.
-
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेम जुळले.
-
त्यानंतर अशोक सराफ यांना त्यांनी प्रपोज देखील केले.
-
पण निवेदिता यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते.
-
‘आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये’, अशी तिच्या आईची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध झाला.
-
पण निवेदिता यांची मोठी बहीण डॉ. मीनल परांजपे यांनी पुढाकार घेत या लग्नासाठी कुटुंबाकडून परवानगी मिळवली.
-
त्यानंतर त्या दोघांनी गोव्यातील मंगेशी मंदिरात जाऊन साधेपणाने लग्न केले.
-
अशोक सराफ आणि निवेदिता यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.
-
अशोक आणि निवेदिता यांना अनिकेत नावाचा मुलगा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : निवेदिता सराफ/इन्स्टाग्राम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर