-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वेचा नुकताच साखरपुडा पार पडला.
-
शिवानीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
शिवानी लवकरच अभिनेता अजिंक्य ननावरेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
‘Aww~Fishily Engaged’ असे कॅप्शन शिवानीने साखरपुड्याच्या फोटोंना दिले आहे.
-
साखरपुड्यासाठी शिवानीने फिकट जांभळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट आणि त्यावर टोपी परिधान केली होती.
-
गेल्या अनेक वर्षांपासून शिवानी आणि अजिंक्य एकमेकांना डेट करत आहेत.
-
अजिंक्यने अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
अजिंक्य सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे.
-
शिवानी आणि अंजिक्यने स्टार प्रवाहवरील ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत एकत्र काम केले होते.
-
शिवानी आणि अंजिक्यच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”