-
अभिनेत्री शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू असतानाच आता लग्नबंधनात अडकल्याचं समोर आलं आहे. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
काल (३१ जानेवारी) अभिनेत्री शिवानी सुर्वेने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
आज शिवानीने अजिंक्य ननावरेशी लग्नगाठ बांधून आयुष्यातल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
शिवानी व अजिंक्यचा शाही लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
शिवानी व अजिंक्यच्या लग्नासोहळ्यातील फोटो, व्हिडीओ चर्चेत आले आहेत. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
लग्नमंडपाला फुलांची आकर्षक सजावट केली होती. (फोटो सौजन्य – शुभम कुलकर्णी इन्स्टाग्राम)
-
नवरदेव अजिंक्यने घोड्यावर बसून लग्नमंडपात एन्ट्री घेतली. (फोटो सौजन्य – शुभम कुलकर्णी इन्स्टाग्राम)
-
लग्नासाठी दोघांनी दोन लूक केले होते. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
विधींसाठी शिवानी व अजिंक्यने पारंपरिक लूक केला होता. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)
-
त्यानंतर शिवानीने फिकट गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. ज्यावर शिवानीच्या लेहेंग्याला मॅचिंग होण्यासाठी फिकट गुलाबी रंगाचा फेटा घातला होता. (फोटो सौजन्य – हेमंत ढोमे इन्स्टाग्राम)
-
शिवानी-अजिंक्यच्या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य – शुभम कुलकर्णी इन्स्टाग्राम)
-
‘झिम्मा २’ चित्रपटातील कलाकार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, सायली संजीव व हेमंत ढोमे लग्नात पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य – शुभम कुलकर्णी इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”