-
छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सुर्वे घराघरांत लोकप्रिय झाली. (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)
-
छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर हळुहळू ती चित्रपटांकडे वळली. (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)
-
वैयक्तिक आयुष्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवानी अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करत होती. अखेर हे दोघेही आता लग्नबंधनात अडकले आहेत. (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)
-
या दोघांचा शाही विवाहसोहळा नुकताच ठाण्यात पार पडला आहे. (फोटो सौजन्य : हेमंत ढोमे इन्स्टाग्राम)
-
यानिमित्ताने शिवानी-अजिंक्यची अनोखी लव्हस्टोरी जाणून घेऊया… (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे व क्षण फिल्म्स इन्स्टाग्राम)
-
‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेमुळे अजिंक्य आणि शिवानीची पहिली भेट झाली होती. (फोटो सौजन्य : शुभम कुलकर्णी इन्स्टाग्राम)
-
मालिका संपल्यावर त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे व क्षण फिल्म्स इन्स्टाग्राम)
-
कालांतराने या दोघांमध्ये घट्ट मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे व क्षण फिल्म्स इन्स्टाग्राम)
-
जवळपास २०१५-१६ पासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)
-
रिलेशनशिपमध्ये आल्यावर पुढे वर्षभरातच अजिंक्य-शिवानीने त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितलं. (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे व क्षण फिल्म्स इन्स्टाग्राम)
-
“दोन्ही घरातून आमच्या नात्याला ठळक विरोध आला. हे फक्त आकर्षण आहे असं आमच्या घरच्यांचं मत होतं. तुम्हाला वाटत असेल तुमचं प्रेम खरं आहे आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा, तर तुम्ही दोघेही आम्हाला एकत्र राहून दाखवा असं आम्हाला घरुन सांगितलं गेलं.” असं शिवानीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे व क्षण फिल्म्स इन्स्टाग्राम)
-
शिवानी या मुलाखतीत म्हणाली होती, “२०१७ पासून आतापर्यंत आम्ही त्यांना एकत्र राहून दाखवत आहोत. लॉकडाऊन सुरू झाल्यावर आई-बाबांना आमच्या नात्यावर विश्वास बसला.” (फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे व क्षण फिल्म्स इन्स्टाग्राम)
-
“अजिंक्यचे बाबा म्हणाले होते, जर तुम्ही लॉकडाऊन न भांडता काढताय, तर तुम्ही आयुष्यभर एकत्र राहू शकता. त्यामुळे असं पाहायला गेलं, तर खऱ्या अर्थाने ४ वर्षांनंतर आमच्या घरच्यांनी या नात्याला परवानगी दिली.” असा खुलासा शिवानीने या मुलाखतीत केला होता. (फोटो सौजन्य : शुभम कुलकर्णी इन्स्टाग्राम)
-
अनेक वर्षे एकत्र राहिल्यावर नुकतंच अजिंक्य-शिवानीने थाटामाटात लग्न केलं आहे. (फोटो सौजन्य : कुशल बद्रिके इन्स्टाग्राम)
-
सध्या मराठी कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य : शुभम कुलकर्णी इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”