-
आपल्या बोल्ड लूक्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हीचे निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी सरव्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग)मुळे तिचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.
-
पूनमच्या निधनामुळे बऱ्याच लोकांना धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवरुन तिच्या निधनाबद्दल माहिती कळवली.
-
२०१३ मध्ये पूनमने ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण त्याआधीपासूनच पूनम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असायची.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून इतकी लोकप्रियता मिळवणारी पूनम पांडे ही ठाण्याची होती हे फारसं कुणाला ठाऊक नसेल. ‘मुंबई मिरर’च्या एका रिपोर्टनुसार पूनमचा जन्म ठाणे शहरात झाला अन् ठाण्याच्या लोकमान्य नगरमध्येच ती लहानाची मोठी झाली. इतकंच नव्हे तर वर्तक नगरमधील ‘द लिटिल फ्लॉवर स्कूल’मधून पूनमचं शालेय शिक्षण झालं.
-
पुनमचा भाऊ नीलेश पांडेने मध्यंतरी मीडियाशी संवाद साधतांना पूनमबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलेला. पूनमला लहानपणापासूनच मॉडेलिंगमध्ये करिअर करायची इच्छा असल्याचंही त्याने स्पष्ट केलं होतं.
-
२०११ च्या क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान पूनम पांडे ही जास्त चर्चेत आली. यंदाचा वर्ल्डकप भारताने जिंकला तर आपण न्यूड फोटोशूट करणार अशी घोषणा पुनमने केली होती ज्यामुळे ती अचानक प्रकाशझोतात आली. अर्थात तिने काही तसे फोटोशूट केले नाही. पण या वक्तव्यामुळे पूनम पांडे ही कोण हे लोकांच्या ध्यानात आलं.
-
पुढे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून पूनमने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आपले बरेच हॉट, बोल्ड काही अर्धनग्न फोटोज तिने तिच्या अकाऊंटवर शेअर केले ज्यामुळे तिच्यावर चांगलीच टीकाही झाली.
-
आपल्या अशाच बोल्ड फोटोज आणि व्हिडीओजमुळे पूनम कायम चर्चेत असायची. बऱ्याचदा तिच्या या हॉट बोल्ड व्हिडीओजवरुन तिच्यावर कारवाईही झाली आहे. स्वतःची एक वेबसाईट सुरू करून पूनमने तिचे हॉट व्हिडीओज पोस्ट करायला सुरुवात केली होती पण नंतर ती साईटही बंद करण्यात आली.
-
सॅम बॉम्बेबरोबरचं तिचं लग्नदेखील फार चर्चेत होतं. लग्नानंतर काहीच दिवसांत तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. सॅम पूनमकडे सतत पैशांची मागणी करायचा व तिला मारहाण करायचा याचा खुलासा पूनमने ‘लॉक अप’ या शोदरम्यानच केला होता.
-
एकूणच पूनमचं आयुष्य हे अशाच वादग्रस्त घटनांनी भरलेलंच होतं. याबरोबरच तिने मॉडेलिंग आणि रीयालिटी शोच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळवली. वेगवेगळ्या मासिकांसाठी पूनम पांडे फोटोशूट करत असे.
-
पूनमने वेगवेगळ्या चित्रपटात काम केलंच आहे याबरोबरच तिने ‘बिग बॉस’सारख्या शोमध्येसुद्धा सहभाग घेतला होता. शिवाय अल्ट बालाजीच्या ‘लॉक अप’ या शोसाठी पूनमला आठवड्याला तब्बल ३ लाख रुपये मिळत असत.
-
मुंबईच्या एका उच्चभ्रू परिसरात एका मोठ्या आलीशान फ्लॅटमध्ये पूनम राहायची. याबरोबरच स्वतःच्या एरॉटिक अॅपमधूनही पूनमला चांगलेच पैसे मिळायचे. या अँन्ड्रॉईड अॅपवर पूनम तिचे खासगी फोटोज आणि व्हिडीओज शेअर करायची. या अॅपचे ३२ लाख पेड सब्सक्राइबर आहेत, अन् पूनमची सर्वात जास्त कमाई याच अॅपमधून होत असे.
-
बांद्रा येथील एका चार मजली इमारतीमध्ये पूनमचे घर होते. याचबरोबर पूनमला महागड्या गाड्यांचीही आवड होती, तिच्याकडे एक बीएमडब्लू गाडी होती. पूनमचा व्यवसाय सांभाळण्यासाठी तिचे २७ क्रू मेंबर्स कायम तिच्याबरोबरच रहात.
-
आपलं जीवन अत्यंत थाटात जगणाऱ्या पूनमच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घ्याल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. चित्रपट, सीरिज, फोटोशूट आणि खासगी एरॉटिक अॅप यांच्या माध्यमातून पूनमने चांगलीच कमाई केली.
-
जाता जाता पूनम तिची ५२ कोटींची संपत्ती सोडून गेली आहे. तिच्या जाण्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे. (सर्व फोटो सौजन्य : पूनम पांडे / इंस्टाग्राम अकाऊंट)

Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार