कंगना रणौत, ही एक उत्तम अभिनेत्री असून ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना मूळची हिमाचल प्रदेशची असून ती तिथल्या घराचे फोटो नेहमीच शेअर करत असते. अलीकडचे मनालीमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर तिने तिच्या घराचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केले होते.दीर्घ-प्रतीक्षेनंतर बर्फ पडल्याने कंगनाने स्थानिक आणि सफरचंदाचे उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्साहाबद्दल भाष्य केले. कंगना रणौत मनालीतील तिच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.कंगना रणौतचे घर सामान्यतः माउंटन स्टाइलचे आहे.“हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांनी दिलेल्या या भेटवस्तू, आपण या पिढीत तरी गमावू शकत नाही. गमावणारी ती पिढी आपली नसावी.” असही ती म्हणाली होती.एका जुन्या क्लिपमध्ये, कंगनाने या दगडी घराद्वारे आपल्या परंपरा कशा ‘जतन’ केल्या आहेत हे सांगितले.“मी एक नवीन घर बांधले आहे, ते माझ्या मनालीमधील सध्याच्या घराचा विस्तार आहे. परंतु यावेळी मी हे घर अस्सल ठेवले आहे, विशेषत: नदीचे दगड, लाकडापासून बनविलेले माउंटन स्टाइलचे हे घर आहे.दरम्यान, कंगनाचा आगामी चित्रपट ‘इमरजेंसी’ १४ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (All Photos- Kangana Ranaut/Instagram)