-
Bhoothnath Banku Bhaiya: १६ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन शेअर करत हिट ठरलेला छोटा बंकू आता पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
-
भूतनाथ सिनेमात बंकूची भूमिका करणारा बालकलाकार आता १६ वर्षांनी कसा दिसतोय याची झलक दाखवणारे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
अमान सिद्दीकीने भूतनाथ मधील बिनधास्त पण तरीही हळव्या, खोडकर, प्रेमळ मुलाची भूमिका इतकी सुंदररित्या पार पाडली होती की त्याने प्रेक्षकांना एकाच सिनेमात हसवून, रडवून पूर्णपणे स्तब्ध सुद्धा केलं होतं.
-
त्यानंतर काही जाहिरातींमध्ये सुद्धा बंकू म्हणजेच अमान दिसला होता पण तो आता मोठा झाल्यावर कसा दिसतो हे आता व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये पाहायला मिळतंय.
-
अमन सिद्दीकीने २०२० मध्ये एकदा असे सांगितले होते की माझ्या आई वडिलांना मला टीव्हीवर पाहायचे होते म्हणून मी अभिनयाकडे वळलो होतो
-
त्याने तीन वर्षांचा असताना हॉर्लिक्ससाठी एक जाहिरात केली होती. जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासह अमानने भूतनाथ चित्रपट केला तेव्हा तो फक्त इयत्ता पहिलीत होता.
-
अमनचा आताचा बदललेला लुक पाहून तर त्याला अजिबातच ओळखता येत नाही, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
-
अमान सध्या अभिनय सोडून आपल्या गायनाच्या कलेवर काम करत आहे. मध्यंतरी त्याने मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेज मध्ये परफॉर्म सुद्धा केले होते.
-
भूतनाथ चित्रपट हा लहान मुलांमध्ये तर अजूनही चर्चेत आहे. शाहरुख खान, जुही चावला व महानायक अमिताभ बच्चन अशी तगडी कलाकार मंडळी असताना पहिलीतील बंकू म्हणजेच अमान भाव खाऊन गेला होता असे म्हणायला हरकत नाही.(सर्व फोटो: इंस्टाग्राम/ लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा