-
‘बिग बॉस’मुळे गेल्या काही महिन्यांपासून अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांची जोडी चांगलीच चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
अंकिता-विकीने १४ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
हे दोघेही मुंबईतील एका सुंदर व आलिशान घरात राहतात. या घरात पाच मोठ्या बेडरुम्स आहेत. (फोटो सौजन्य : तेहेलका युट्यूब चॅनेल)
-
‘बिग बॉस’ संपल्यावर विकी जैनने शोमधील त्यांचा सहस्पर्धक सनी आर्या उर्फ तेहेलकाला आपल्या घरी आमंत्रित केलं होतं. (फोटो सौजन्य : तेहेलका युट्यूब चॅनेल)
-
अंकिता-विकीच्या आलिशान घराची तुलना तेहेलकाने मुकेश अंबानींच्या बंगल्याशी केली आहे. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
“अंकिता-विकीच्या घरात प्रशस्त खोल्या, होम थिएटर व तीन स्विमिंग पूल आहेत” असं तेहेलकाने त्याच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. (फोटो सौजन्य : तेहेलका युट्यूब चॅनेल)
-
अंकिता-विकीने लग्नापूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये हे घर खरेदी केलं होतं. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
परंतु, घराचं इंटिरियर डिझाइन पूर्ण होईपर्यंत विकी सासरी राहत होता. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
घराचं काम पूर्ण झाल्यावर अंकिताने-विकीने कुटुंबीयांच्या उपस्थितीत गृहप्रवेश केला होता. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
या जोडप्याचं संपूर्ण घर अभिनेत्रीच्या आवडीनुसार पांढऱ्या रंगाच्या थीमने डिझाइन करण्यात आलं आहे. यामुळेच अंकिता-विकीने त्यांच्या घराला ‘द व्हाइट हाऊस’ असं नाव दिलं आहे. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
घराबाहेर “विकास अँड अंकिता” अशी नेमप्लेट लावण्यात आलेली आहे. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
याशिवाय त्यांच्या बाल्कनीतून सुंदर असा मुंबई शहराचा व्ह्यू पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्रीच्या घरात तुम्हाला सुंदर असं बाप्पाचं मंदिर देखील पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
अंकिता-विकीचं घर सर्व सुखसोयी व सुविधांनी सजलेलं आहे. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
‘बिग बॉस’ शो संपल्यावर सध्या सर्वत्र अंकिता-विकीच्या आलिशान घराची चर्चा होत आहे. (फोटो सौजन्य : तेहेलका युट्यूब चॅनेल)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल