-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
-
आपल्या अभिनयाच्या जोरावर गिरीजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
करिअरबरोबरच गिरीजाने तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील उंच भरारी घेतली आहे.
-
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी गिरीजाने हक्काचं घर खरेदी केलं आहे.
-
इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गिरीजाने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली.
-
गिरीजाने नव्या घराच्या दारावर लावलेली खणाची डिझाइन असलेली नेमप्लेट सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेते.
-
या आयताकृती नेमप्लेटवर मध्यभागी ‘गिरीजा प्रभू’ हे नाव पांढऱ्या अक्षरात लिहिण्यात आलं आहे. याशिवाय नेमप्लेटला खालील बाजूने घुंगरांची आकर्षक डिझाइन करण्यात आलेली आहे.
-
मार्गशीष महिन्यात घरच्या घरी पूजा करत गिरीजाने या नव्या घराची गूडन्यूज सर्वांना दिली होती.
-
सध्या अभिनेत्रीच्या घराबाहेरील या हटके नेमप्लेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय मनोरंजन विश्वातील कलाकार गिरीजावर नव्या घरासाठी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू इन्स्टाग्राम )
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच