-
अभिनेत्री जान्हवी कपूरने शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली काही दिवसांपूर्वीच दिली आहे.
-
त्यानंतर दोघे एकत्र तिरुपतीला दर्शनाला गेले होते.
-
शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.
-
सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे.
-
आई स्मृतीच्या वाढदिवसानिमित्त शिखरचा भाऊ वीरने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली.
-
त्यावर जान्हवी कपूरने ‘Best People’ अशी कमेंट केली आहे. त्यानंतर स्मृती यांची चर्चा होत आहे.
-
स्मृती पहारियांचे वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आहेत.
-
सुशीलकुमार शिंदे यांना स्मृती, प्रिती व प्रणिती या तीन मुली आहेत.
-
स्मृती यांचं लग्न संजय पहारियांशी झालं असून त्यांना वीर व शिखर ही दोन मुलं आहेत.
-
शिखर व जान्हवी एकमेकांना डेट करत आहेत.
-
स्मृती शिंदे या हिंदी व मराठी मालिकांची निर्मिती करतात.
-
स्टार प्रवाहवर ‘कुण्या राजाची गं तू राणी’ या मालिकेची निर्मिती त्यांनी केली आहे.
-
हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांच्या भूमिका असलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेची निर्मितीही स्मृती शिंदेंनी केली होती.
-
दिल बेकरार, एक महानायक डॉ. बीआर आंबेडकर या मालिकांची निर्मितीही स्मृती शिंदेंची होती. याशिवाय अनेक मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे.
-
स्मृती शिंदे, सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी या मैत्रिणी आहेत.
-
स्मृती या सोशल मीडियावर खूप सक्रिय असून त्या फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.
-
त्यांनी विविध कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
(स्मृती शिंदेंचे सर्व फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख