-
श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
चित्रपटांव्यतिरिक्त श्रद्धा सोशल मीडियावरही सक्रिय असते. अलीकडेच, तिने सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली, ज्याचे कॅप्शन असे होते की तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.
-
सध्या बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी लग्न करत आहेत, अशातच श्रद्धा कपूरही लवकरच लग्न करणार का, अशी चर्चा तिच्या पोस्टमुळे होऊ लागली आहे.
-
या फोटोंमध्ये श्रद्धाने सुंदर पांढरा नेट पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. या अगदी सिंपल लूकमध्ये श्रद्धा खूपच गोड दिसत आहे.
-
अभिनेत्री खूपच कमी मेकअप करते, त्यामुळे खरे सौंदर्य या फोटोत दिसून येते.
-
श्रद्धाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडतोय. श्रद्धाचे हे साधे पण अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
यासोबतच या पोस्टमध्ये श्रद्धाने दिलेल्या कॅप्शनचीही जोरदार चर्चा होत आहे. हा फोटो शेअर करताना श्रद्धाने लिहिले की, मी छान दिसतेय, त्यामुळे लग्न करू का?
-
श्रद्धाच्या या पोस्टवर तिचा भाऊ सिद्धांत कपूरने कमेंट केली. ‘टाईमपास चालू आहे ना,’ असं तो म्हणाला. त्यावर श्रद्धाने हसणारे इमोजी कमेंट करून उत्तर दिले.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा ‘तू झुठी मैं मक्कार’ चा लेखक राहुल मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटलं जात आहे.
-
श्रद्धाने अद्याप याबाबत काहीही खुलासा केलेला नाही, पण आता तिच्या नवीन पोस्टमुळे त्यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू आहे.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”