-
आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स २०२४ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील कलाकारांसाठी हा विशेष सोहळा होता. अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. सुष्मिता सेन, रकुल प्रीत सिंग, कार्तिक आर्यन, सान्या मल्होत्रा आणि इतर नामवंत कलाकारांचा रेड कार्पेट लूक सध्या चर्चेत आहे.
-
सुष्मिता सेनने सीक्वेन्स असलेला निळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. या स्ट्रॅपलेस आणि बॉडी-फिटिंग गाउनवर सुष्मिताने लाल रंगाचा स्टोल वापरला होता. तसेच तिने मॅचिंग पर्सचा वापर करत हा लूक परिपूर्ण केला.
-
कार्तिक आर्यनने निळ्या रंगाच्या सूटचा पर्याय निवडला. बटण-डाउन शुभ्र पांढरा शर्ट, मॅचिंग ब्लेझर आणि ट्राउझर्स एक क्लासिक लूक देतो.
-
रकुल प्रीत सिंगने प्लंजिग नेकलाईनच्या काळ्या गाऊनची निवड केली. या बॉडी-फिटिंग स्लिट गाउन वर तिने मॅचिंग ग्लोव्ह्ज आणि डायमंडचे दागिने परिधान केले होते. काळ्या रंगाच्या सीक्वेन्सच्या हील्ससह तिने हा लूक पूर्ण केला.
-
अदा शर्माने पेस्टल गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये सगळ्यांच लक्ष वेधलं. ऑफ-द-शोल्डर डिझाईनर गाउनसह स्टायलिश बेल्टचा वापर करत अदा शर्मा रेड कार्पेटवर सुंदर दिसत होती.
-
पेस्टल आकाशी रंगाच्या साडीची निवड हिना खानने केली होती. या साडीवर नारंगी रंगाच्या पानांची प्रिंट होती. यावर तिने प्लंजिग नेकलाईनचा फूल स्लीव्ज फिट मॅचिंग ब्लाउज परिधान केला होता. गोल्ड हूप्स, कडा आणि गोल्डन रिंग्स या दागिन्यांची जोड या लूकसाठी उत्तम ठरली.
-
सान्या मल्होत्राने सीक्वेन्सने सजलेल्या काळ्या साडीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. साडीच्या पदरावर फुलांची डिझाईन होती. फिट हॉल्टर-नेक सेक्विन्स ब्लाउज साडीला मॅच करत होतं.
-
मनोज बाजपेयी काळ्या रंगाच्या रत्नजडित सूटमध्ये स्टायलिश दिसत होते.
-
काळ्या कॉर्सेट गाऊनमध्ये राधिका मदन अतिशय सुंदर दिसत होती.
-
सैयामी खेर ने काळ्या रंगाचा फ्लेअर स्कर्ट आणि पांढरा टॉप परिधान केला होता. मिनिमल दागिन्यांमध्ये ती सुरेख दिसत होती. (All Photos- Varinder Chawla, Indian Express)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”