-
‘झी मराठी’वर लवकरच ‘पारु’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे.
-
‘पारु’ या नव्या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे, अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
‘पारु’ या नव्या मालिकेत अभिनेत्री मुग्धा कर्णिक अहिल्यादेवी किर्लोस्कर हे पात्र साकारणार आहेत.
-
‘पारु’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यावर अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या जबरदस्त लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
भरजरी साडी, गळ्यात दागदागिने, हातात अंगठ्या, केसात गजरा अन् कपाळाला मोठी टिकली अशा डॅशिंग लूकमध्ये अहिल्यादेवी पाहायला मिळत आहेत.
-
या सगळ्यात अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या हटके मंगळसूत्राने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या डॅशिंग भूमिकेला शोभेल असं गोलाकार आकाराचं मोठं मंत्रळसूत्र या पात्राला देण्यात आलं आहे.
-
या मंगळसूत्रातील गोलाकार पेंडंटच्या बाजूला पांढऱ्या शुभ्र मोत्यांची डिझाइन करण्यात आलेली आहे.
-
दरम्यान, ‘पारु’ ही नवीन मालिका येत्या १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं प्रक्षेपण सोम-शनि सायंकाळी ७.३० वाजता करण्यात येणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : झी मराठी व मुग्धा कर्णिक इन्स्टाग्राम )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”