-
अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
क्षितिजा घोसाळकर हिच्याबरोबर महाराष्ट्राचा लाडका दगडू लग्न करणार आहे. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
१४ फेब्रुवारीला साखरपुडा असून २४ फेब्रुवारीला दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
त्यापूर्वी प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोने सोलो प्री-वेडिंग फोटोशूट केलं; जे सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरची ओळख ‘गुंतले हृदय हे’ या फोटो सीरिजमुळे झाली होती. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
क्षितिजाची ही फोटो सीरिज प्रथमेशला खूप आवडली होती. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
प्रथमेशने ‘गुंतले हृदय हे’ ही फोटो सीरिज पाहून थेट क्षितिजाला मेसेज करून तिचं कौतुक केलं होतं. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
याच फोटो सीरिजनंतर प्रथमेश व क्षितिजामधलं बोलणं हळूहळू वाढलं आणि कालांतराने त्याच प्रेमात रुपांतरित झालं. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे क्षितिजाने लग्नाअगोदर ‘गुंतले हृदय हे’ या फोटो सीरिजचं रिक्रिएशन करून प्रथमेशचा सरप्राईज दिलं. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
प्रेमाच्या खास आठवणीसह, लेव्हेंडर रंगाच्या साडीवर, क्षितिजाने हे सोलो प्री-वेडिंग फोटोशूट केलं. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
या फोटोशूटमध्ये क्षितिजाने प्रथमेशला लिहिलं खास पत्र व त्यावरच्या पासपोर्ट साईज फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
तसंच या फोटोंमध्ये तिमे प्रथमेशने दिलेलं पहिलं चॉकलेट, सोनेरी गुलाब याचा सुंदर वापर केला आहे. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
शिवाय एका डायरीचाही वापर केला आहे. ज्यामध्ये दोघांच्या प्रेमाच्या आठवणी लिहिल्या आहेत. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
क्षितिजाने केलेलं सोलो प्री-वेडिंग फोटोशूट पाहून प्रथमेशला आश्चर्याचा धक्का बसला. (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
-
प्रथमेश क्षितिजाचे सोलो प्री-वेडिंग फोटोशूट पाहून म्हणाला, “You are full of Surprises…खूप प्रेम…किती भारी वाटतंय हे बघून सिनेमातल्या छान फ्लॅशबॅक सारखं.. प्रेमात थोडं old school असणं भारी असतं.. हे खरंय…मी जाईपर्यंत तुझं थांबणं शेवटपर्यंत राहू दे….आय लव्ह यू…किती छान लिहितेस तू….इतकं भारी वाटतंय….अजून एकदा प्रेमात पडलास मला…खूप प्रेम…” (फोटो सौजन्य – क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच