-
टीव्ही अभिनेत्री अस्मिता सूदने तिचा बॉयफ्रेंड सिद्ध मेहताशी गुपचूप लग्न केलं आहे.
-
‘बदतमीज दिल’ फेम अस्मिता सूदने तिचा बॉयफ्रेंड सिद्ध मेहताशी गोव्यात शाही सोहळ्यात लग्न केलं.
-
तिने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
अस्मिताने २ फेब्रुवारीला कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सिद्ध मेहताशी लग्नगाठ बांधली.
-
अस्मिता सूद आणि सिद्ध मेहता बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
-
सिद्धने अस्मिताला लग्नासाठी प्रपोज केले होते आणि तिला एक सुंदर अंगठीही भेट दिली होती.
-
अस्मिताने लग्नासाठी गुलाबी रंगाचा लेहेंगा निवडला, तर सिद्धने पांढरी शेरवानी घातली होती.
-
अस्मिताने कुंदनचे दागिने, नेकलेस, मॅचिंग कानातले आणि लाल बांगड्या घालून तिचा लूक पूर्ण केला.
-
अस्मिता व सिद्ध यांनी लग्नाचे फोटो शेअर केल्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
सिद्धबद्दल बोलायचं झाल्यास तो गुजराती बिझनेसमन आहे.
-
त्याचा राजकोटमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे.
-
(फोटो- अस्मिता सूद इन्स्टाग्राम)

३ मार्च पंचांग: विनायक चतुर्थीला मेष ते मीनपैकी ‘या’ राशींना बाप्पा पावणार; तुमचा दिवस असेल का आनंदी? वाचा राशिभविष्य