-
बाॅलीवूडची क्वीन कंगना रणौत तिच्या अनोख्या भूमिकांमुळे सतत चर्चेत असते.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी कंगना अनेक गोष्टींवर आपले मत मांडताना दिसते.
-
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेत्रीने निळ्या रंगाची जरीची सुंदर साडी परिधान केली आहे.
-
निळ्या रंगाच्या या साडीवर कंगनाने लाल रंगाची मोठी टिकली लावून व झुमके घालून हा लूक पूर्ण केला आहे.
-
कंगनाने हा लूक रेट्रो पद्धतीचा ठेवला आहे. कंगनाच्या भुवया जुन्या अभिनेत्रींसारख्या स्टाईल केल्या आहेत तर मिनिमल मेकअप आणि फिकट गुलाबी रंगाच्या लिपस्टिकचा वापर तिने केला आहे.
-
कंगनाचा हा लूक ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांच्या लूकवरून प्रेरित आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये “साधनाजींच्या सौंदर्याने प्रेरित असलेला आजचा लूक, तुम्हाला कसा वाटला?” असं तिने विचारलं.
-
६०व्या दशकात साधनाजींनी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भूरळ पाडली होती. ‘असली नकली’ या चित्रपटातील ‘तेरा मेरा प्यार अमर’ या लता मंगेशकरांच्या गाण्याचा वापर कंगनाने या लूकसाठी केला आहे.
-
दरम्यान लवकरच कंगना ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. (All Photos- kanganaranaut/Instagram)

पदरात पडेल सुख ते हितशत्रूंपासून रहा सावध; प्रदोष व्रताबरोबर अनंग त्रयोदशीचा योगायोग तुमच्या आयुष्यात भरणार का नवे रंग? वाचा राशिभविष्य