-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली.
-
लग्नाला दीड महिना उलटून गेल्यावर आता या जोडप्याने चाहत्यांबरोबर एक खास गोष्ट शेअर केली आहे.
-
लग्नानंतर या जोडप्याने घराच्या नेमप्लेटमध्ये बदल केला आहे.
-
दारावरच्या सुंदर नेमप्लेटची पहिली झलक अभिनेत्रीने नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
-
लग्नानंतर स्वानंदीने तिच्या घरासाठी साधी अन् सुंदर अशी नेमप्लेट बनवून घेतली आहे.
-
रातराणीच्या फुलांची डिझाइन असलेली ही सुंदर लाकडी नेमप्लेट प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते.
-
या नेमप्लेटवर मध्यभागी “स्वानंदी आशिष” असं नाव लिहिण्यात आलं आहे.
-
या नेमप्लेटचा सुंदर फोटो पाहून स्वानंदीचे बाबा ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांनी कमेंट सेक्शनमध्ये इमोजी शेअर करत लेकीचं कौतुक केलं आहे.
-
दरम्यान, स्वानंदी-आशिषच्या घराची ही नवीन नेमप्लेट नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
![Team India](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Team-India-2.jpg?w=300&h=200&crop=1)
जगज्जेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस, ICC पाठोपाठ BCCI कडून ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस