-
रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे. तिने हिंदी, तामिळ, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
या अभिनेत्रीला साऊथ चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
रकुलने ‘यारिया’ (2014) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाव्यतिरिक्त तिने दे दे प्यार दे (२०१९), रनवे ३४ (२०२२), आणि डॉक्टर जी (२०२२) मध्ये काम केले आहे.
-
अलीकडे रकुल प्रीत सिंह तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री रकुल काही काळापासून अभिनेता जॅकी भगनाला डेट करत आहे. आता बॉलीवूडची ही जोडी २१ फेब्रुवारी, बुधवारी लग्न करणार आहे.
-
रकुल आणि जॅकी या दोघांच्याही कुटुंबात लग्नाची तयारी सुरू झाली आहे. नुकतेच रकुल आणि जॅकीच्या निमंत्रण पत्रिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊयात.
-
जॅकी भगनानी हा अभिनेता व चित्रपट निर्माता आहे. त्याचे वडील वाशू भगनानी बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत.
-
जॅकीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास त्याची नेटवर्थ ४५ कोटी रुपये आहे. मनीमिंटने याबद्दल वृत्त दिलंय.
-
रकुल प्रीतबद्दल बोलायचं झाल्यास तिची संपत्ती ४९ कोटी रुपये आहे. याबद्दल लाइफस्टाइल एशियाने वृत्त दिलंय.
-
रकुल जॅकीपेक्षा जास्त श्रीमंत आहे.
-
दरम्यान, सध्या या जोडप्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
-
(सर्व फोटो – रकुल प्रीत व जॅकी भगनानी इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं