-
गेल्या काही दिवसांपासून एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरची चर्चा रंगली आहे. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
या प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा फ्लॅट खरेदी केला आहे. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
अक्षय कुमारच्या अंधेरीत फ्लॅटमध्ये काही दिवसांपूर्वी या कंटेंट क्रिएटरने गृहप्रवेश केला. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी या कंटेंट क्रिएटरने स्वतःच्या हक्काचं घरं घेतलं. त्यामुळे तिचं चहूबाजूने कौतुक होतं आहे. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
अक्षय कुमारचा अंधेरीतील फ्लॅट खरेदी करणारी ही प्रसिद्ध कंटेट क्रिएटर म्हणजे चांदनी भाभदा. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर ती चांदनी मिमिक या नावाने लोकप्रिय आहे.. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
चांदनी आलिया भट्टची हुबेहुब मिमिक्री करते. तिच्या या कौशल्याच आलियासह अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
चांदनीचे इन्स्टाग्रामवर 495k फॉलोअर्स आहेत. तिने वकिलीचे शिक्षण घेतलं आहे. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
याशिवाय चांदनी व्हीजे म्हणजे व्हिडीओ जॉकी आहे. पण ती पूर्णपणे वेळ कंटेंट क्रिएटरचं काम करते. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
अशा या प्रसिद्ध चांदनीने काही दिवसांपूर्वी नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
“वयाच्या २५ वर्षांच्या आधी घर खरेदी केलं. घराचा ईएमआय देत आहे,” असं कॅप्शन लिहित तिने गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले होते. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
या फोटोमध्ये चांदनी पूजा-अर्चा करताना दिसली. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
तसंच डोक्यावर कलश घेऊन नव्या घरात प्रवेश करताना पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
चांदनीने अक्षय कुमारचा हा फ्लॅट किती रुपयांचा घेतला असेल? असा प्रश्न सगळ्यांच पडला होता. ज्याचं उत्तर आता मिळालं आहे. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)
-
मॅजिकब्रिक्स डॉटकॉमच्या मते, चांदनीने अक्षय कुमारचा अंधेरीतील फ्लॅट ५ ते १० कोटींपर्यंत खरेदी केला असू शकतो. (फोटो सौजन्य – chandnimimic इन्स्टाग्राम)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल