-
अभिनेता प्रथमेश परबच्या घरी सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा १४ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला.
-
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांनी एक नवी सुरुवात केली आहे.
-
या सोहळ्यातील काही खास क्षण अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
“आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला…इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील” असं सुंदर कॅप्शन प्रथमेशने त्याच्या साखरपुड्याच्या फोटोंना दिलं आहे.
-
साखरपुड्यात अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी पैठणी साडी नेसली होती.
-
प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. पुढे हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
१४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण झाली. म्हणूनच या खास दिवशी दोघांनीही साखरपुडा केला.
-
दरम्यान, सध्या मराठी कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब इन्स्टाग्राम )
![Happy Valentine’s Day 2025 Wishes in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-16.26.59.jpeg?w=300&h=200&crop=1)
Valentine’s Day 2025 Wishes : प्रिय व्यक्तीला द्या ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या मराठमोळ्या शुभेच्छा; Whatsapp message, Status, Facebook वर प्रिय व्यक्तीला पाठवा प्रेमाच्या सुंदर चारोळ्या