-
‘बिग बॉस’ ओटीटी विजेती व Splitsvilla फेम अभिनेत्री दिव्या अग्रवाल लवकरच बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
दिव्याला ४ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अपूर्वने प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती.
-
अपूर्वने प्रपोज केल्यावर दिव्याने लगेच लग्नासाठी होकार कळवला होता.
-
अभिनेत्रीच्या ‘बायCO’ या खास डिझाइनच्या अंगठीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
आता साधारण वर्षभराने ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.
-
दिव्याचा हा होणारा नवरा नेमकं काय काम करतो? जाणून घेऊया…
-
अपूर्व पाडगावकर इंजिनिअर असून त्याने एमबीए देखील पूर्ण केलं आहे.
-
याशिवाय तो मराठी उद्योजक म्हणून ओळखला जातो.
-
अपूर्व मुंबईतील अनेक नामांकित रेस्टॉरंट्सचा मालक आहे.
-
काही दिवसांपूर्वीच दिव्या आणि अपूर्वने मिळून ‘Realm Mumbai’ हे नवीन रेस्टॉरंट सुरू केलं.
-
याशिवाय वैयक्तिक आयुष्यात अपूर्व ‘प्राणीप्रेमी’ असून त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये त्याने ‘Dog Father’ असं नमूद केलं आहे.
-
दिव्या व अपूर्व येत्या २० फेब्रुवारीला चेंबूर येथील घरी लग्नगाठ बांधणार आहेत.
-
१८ फेब्रुवारीपासून अभिनेत्रीच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होणार आहे.
-
१९ फेब्रुवारीला अभिनेत्रीच्या घरी खास मेहंदी सोहळा रंगणार आहे.
-
तसेच २० फेब्रुवारी संध्याकाळी दिव्याचा लग्नसोहळा पार पडेल. ( सर्व फोटो सौजन्य : दिव्या अग्रवाल )
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास