-
रणवीर सिंग व पॉर्नस्टार जॉनी सीन्स यांची पुरुषांच्या समस्येवर भाष्य करणारी जाहिरात सध्या चर्चेत आहे.
-
या जाहिरातीत जॉनीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री चर्चेत आली आहे.
-
या अभिनेत्रीचं नाव भावना चौहान असून तिने आजवर अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.
-
या जाहिरातीपूर्वी भावना चौहान सलमान खानचा चित्रपट ‘जय हो’ आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘हंसी को फसी’ या चित्रपटात दिसली आहे.
-
चित्रपटांव्यतिरिक्त, भावना अनेक मालिकांमध्ये दिसली, ज्यात ‘रझिया सुलतान’, ‘ये है आशिकी’, ‘शौर्य’ आणि ‘अनोखी की कहानी’ सारख्या शोचा समावेश आहे.
-
भावनाला सासू आणि सुनेचे शो अजिबात आवडत नाहीत, म्हणूनच तिने अशा मालिकांमध्ये कधी काम केले नाही.
-
या जाहिरातीबद्दल बोलताना भावनाने सांगितलं की तिने या जाहिरातीसाठी ऑडिशन दिली होती आणि या जाहिरातीची स्क्रिप्ट वाचून ती खूप हसली होती.
-
WWE मधील प्रसिद्ध रेसरल जॉन सीना असणार अशी तिची समजूत झाली होती, पण नंतर तिला कळलं की, जाहिरातमीमध्ये जॉन सीना नसून जॉनी सीन्स आहे.
-
रणवीरबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तर, जॉनी सीन्सबरोबर अधिक काही बोलण्याची संधी मिळाली नाही, तो खूप प्रोफेशनल आहे, असेही भावनाने यावेळी म्हटलं.
-
दरम्यान, भावनाने यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलंय.
-
तसेच शाहरुख खानबरोबरही तिने एका जाहिरातीत काम केलंय.
-
(सर्व फोटो – भावना चौहान इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं