-
‘देवों के देव महादेव’ मध्ये पार्वतीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनारिका भदोरियाच्या लग्नाचे विधी सुरू आहेत.
-
तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत सोनारिका व तिचा होणारा पती दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
-
सोनारिका व्यावसायिक विकास पाराशरशी लग्न करतेय.
-
दोघांच्या लग्नाआधीचे सर्व विधी राजस्थानमधील रणथंभोरमध्ये पार पडले.
-
त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले.
-
‘तेरे संग यारा खुश रंग बहारा’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले.
-
तिने या खास सोहळ्यासाठी प्री-स्टिच्ड साडी व ग्लॅमरस ब्लाऊज परिधान केलं होतं.
-
तर विकासने छान असा पिवळा कुर्ता घातला होता.
-
सोनारिका व विकास या दोघांची पहिली भेट जिममध्ये झाली होती.
-
मैत्रीनंतर नात्याचे रुपांतर प्रेमात झाले.
-
७ वर्षे डेट केल्यानंतर हे जोडपं लग्न करत आहे. (सर्व फोटो – सोनारिका भदोरिया इन्स्टाग्राम)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक