-
भारतातील पावर कपल म्हणून ओळखले जाणारे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 2017 मध्ये विवाह बंधनात अडकले. 2021 च्या जानेवारीमध्ये, त्यांनी आपल्या पहिल्या मुली म्हणजेच वामिकाचे स्वागत केले होते.
-
2024 च्या सुरवातीला त्यांनी चाहत्यांना पुन्हा एकदा गोड बातमी देत त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची घोषणा केली.
-
15 फेब्रुवारीला जन्मलेल्या या बाळाचे नाव ‘अकाय’ असे ठेवण्यात आले आहे.
-
अनुष्का आणि विराटने ही गोड बातमी आपल्या सोशल मीडियावर शेअर करून त्यांचा आनंद व्यक्त केला आणि आपल्या बाळासाठी आशीर्वादही मागितले.
-
अकायचा जन्म मात्र लंडनच्या एका रुग्णालयात झाला आहे यानंतर अकाय नेमका कोणत्या देशाचा नागरिक आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी कमेन्ट करत अकाय ब्रिटिश नागरिक होणार का असा प्रश्न विचारला आहे.
-
केवळ जन्म दुसऱ्या देशात झाल्याने त्या देशाचे नागरिकत्व मिळते का? दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळण्यासाठी कोणत्या अटी असतात, याबाबत जाणून घेऊया.
-
नियमांनुसार फक्त यूकेमध्ये जन्म घेतल्याने अकायला ब्रिटीश नागरिकत्व मिळणार नाही.
-
ब्रिटिश नागरिकत्व मिळवण्यासाठी कमीत कमी एक पालक ब्रिटीश नागरिक असणे आवश्यक आहे.
-
जरी त्या जोडप्याची लंडनमध्ये मालमत्ता असली तरीही नियमांनुसार कोणत्याही जोडप्याला एक ठराविक कालावधीनंतरच स्थायिक अशी मंजूरी मिळते.
-
अकायच्या बाबतीत, त्याचा जन्म लंडनमध्ये झाला असला आणि त्याच्या पालकांची मालमत्ता शहरात असली तरीही तो ब्रिटिश नागरिकत्वासाठी पात्र ठरत नाही.
-
मात्र अकायकडे यूके पासपोर्ट असेल, आणि अकायला भारतीय नागरिक म्हणून ओळखले जाईल.
-
सर्व फोटो : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट

Pahalgam Terror Attack Live : सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर, अरविंद सावंत पत्र लिहित म्हणाले…