-
दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२४, मंगळवारी रात्री मुंबईत पार पडला. शाहरुख खान, राणी मुखर्जी, करीना कपूर, विक्रांत मॅसी, नयनतारा, शाहिद कपूर, आदित्य रॉय कपूर, यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा वेशभूषा करून या शानदार सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांचे रेड कार्पेटवरील फोटो पाहा. (स्रोत: वरिंदर चावला)
-
करीना कपूरने सोनेरी रंगाचा चमकदार असा, पायघोळ ड्रेस घातला होता. तिच्या या सुंदर वेषभुषेने रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. करीना कपूरने तिच्या चमकदार पोशाखाची झलक इन्स्टाग्रामवरदेखील शेअर केली आहे. (स्रोत: वरिंदर चावला)
-
आदित्य रॉय कपूर – रेड कार्पेटवर राखाडी-निळ्या रंगाच्या सूटमध्ये आदित्य रॉय कपूर मस्त पोज देताना या फोटोमध्ये दिसत आहे. (स्रोत: वरिंदर चावला)
-
काळ्या रंगाची आणि अत्यंत बारीक नक्षीकाम असणारी अत्यंत क्लासिक साडी राणी मुखर्जीने एका काळ्या चमकदार मॅचिंग ब्लाउजसह नेसली होती. तिच्याबरोबर या फोटमध्ये दिसणाऱ्या, सर्वांच्या लाडक्या शाहरुख खानने मॉडर्न पद्धतीचा, ऑल-ब्लॅक सूट घातलेला आपण पाहू शकतो. (स्रोत: वरिंदर चावला)
-
नयनताराने, नुकतेच “जवान” मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने प्रचंड आकर्षक अशी सोनेरी रंगाची साडी आणि त्याला साजेसा हिरव्या रंगाचा चोकर सेटची निवड केली होती. (स्रोत: वरिंदर चावला)
-
विक्रांत मॅसीने पांढऱ्या शुभ्र रंगाचा शर्ट, त्यावर काळ्या रंगाचा ब्लेझर, काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचे बूट घातलेले आपल्याला या फोटोमध्ये पाहू शकतो. (स्रोत: वरिंदर चावला)
-
अनिल कपूरने या सोहळ्यासाठी काळ्या रंगाच्या सूट आणि निळ्या रंगाच्या टायची निवड केली होती. (स्रोत: वरिंदर चावला)
-
सान्या मल्होत्रा सोनेरी आणि पांढऱ्या रफल्ड साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिने ही साडी गोल्ड ब्लिंगी ब्लाउजवर नेसली होती. (स्रोत: वरिंदर चावला)
-
करिश्मा तन्नाने सोनेरी-फॉइलची साडी नेसली होती. ही साडी तिने सोनेरी रंगाच्या शर्टसारख्या ब्लाउजसह स्टाईल केली होती. (स्रोत: वरिंदर चावला)
-
शमिता शेट्टीने मोत्यांच्या चोकर नेकलेससह पांढऱ्या रंगाची साडी नसल्याचे या फोटोमध्ये दिसते. (स्रोत: वरिंदर चावला)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल