-
पूजा सावंतच्या घरी सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
पूजाच्या घरी नुकताच व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला.
-
लग्नघरातील सुंदर असे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
लग्नाआधी सावंतांच्या घरी खास व्याही भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
पूजाने यावेळी जांभळ्या रंगाची साडी, गळ्यात सुंदर हार, मोकळे केस असा लूक केला होता. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.
-
व्याहीभोजनाच्या कार्यक्रमाला पूजाचे सासू-सासरे, दीर आणि वहिनी असे सासरचे सगळे लोक उपस्थित होते.
-
पूजाने माहेर अन् सासरच्या मंडळींसह एकत्र खास फोटो शेअर केला आहे.
-
यावेळी पूजाच्या आईने तिच्या सासूबाईंची व जावेची परंपरेनुसार ओटी भरली. या सोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
दरम्यान, पूजा व सिद्धेश आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम व @shrutisbagwe )

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का