-
अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ चित्रपटानंतर चर्चेत आली.
-
अदा अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा मराठी भाषेत बोलताना व गाताना ती दिसली आहे.
-
नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अदाने हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यात अदाला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटासाठी ‘सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री’ चा पुरस्कार मिळाला.
-
अदाने ट्रॉफीसह या पुरस्काराचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यासाठी अदाने पीच रंगाच्या लेहेंग्याची निवड केली होती.
-
प्लंज नेक ब्लाउज, भरीव नक्षीकाम केलेला लेहेंगा, मांगटिका आणि मिनिमल मेकअप लूकमध्ये अदा सुंदर दिसत होती.
-
या फोटोला कॅप्शन देत अदाने लिहिले, “दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड २०२४ मधील ‘सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री’ म्हणून मला गौरविण्यात आलं त्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.”
-
‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ या आगामी चित्रपटाद्वारे अदा पुन्हा एकदा वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (All Photos- adah_ki_adah
/Instagram)

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?