-
ॲनिमल या चित्रपटानंतर तृप्ती डिमरी नॅशनल क्रश बनली. ‘ॲनिमल’मधील रणबीर कपूरबरोबरची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
-
आज तृप्ती डिमरीने नुकताच तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीने २०१७ मध्ये ‘पोस्टर बॉईज’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
यानंतर तिने २०१८ साली आलेल्या ‘लैला मजनू’ या रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
-
तृप्ती डिमरी ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर प्रचंड प्रसिद्धी झोतात आली आणि ती ‘नॅशनल क्रश’ बनली, या अभिनेत्रीला त्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.
-
तृप्ती आता आनंद तिवारीच्या ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ चित्रपटात विकी कौशलसह दिसणार आहे. याशिवाय ती ‘भूलभुलैया ३’ मध्येही दिसणार आहे.
-
तृप्ती डिमरी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोझमधील तिचे सुंदर, स्टायलिस्ट फोटो शेअर करत असते.
-
तृप्ती डिमरीच्या फिटनेसबद्दल सांगायचे तर जिमिंगबरोबर योगा आणि डान्सिंग देखील करते. दररोज संध्याकाळी, एक कप चहानंतर, ती तिच्या डान्स क्लासला जाते, यामुळे तिला फिट राहण्यास आणि स्नायू लवचिक ठेवण्यात मदत होते.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”