-
अभिनेत्री मीना कुमारी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पाकिजा चित्रपट, त्यांचं अजीब दास्ता है ये हे गाणं अशाच सगळ्याच गोष्टी येतात. (सर्व फोटो सौजन्य-meenakumarijifc Instagram)
-
मीना कुमारी यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मीना कुमारी यांना ट्रॅजिडी क्वीन असं म्हटलं जात असे. त्यांच्या काळातल्या त्या गाजलेल्या नायिका होत्या.
-
मीना कुमाारी यांचं खरं नाव मेहजबीन बानो असं होतं. मीना कुमारी यांनी चित्रपटांमध्ये ज्या भूमिका केल्या त्या गंभीर होत्या. साहेब बिबी और गुलाम, पाकिजा, शारदा, यहुदी या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला.
-
मीना कुमारी यांच्या मृत्यूला इतकी वर्षे झाली तरीही त्यांचा चाहता वर्ग आहेच. त्या असताना त्यांच्या चाहता वर्ग होता. त्यापुढच्या पिढ्याही त्यांचे चित्रपट पाहात आला आहे. चित्रपटांमध्ये अनेकदा गंभीर आणि ट्रॅजिक भूमिका साकारल्यानेच त्यांना ट्रॅजिडी क्वीन म्हटलं जायचं.
-
सौंदर्याची खाण, नजाकत आणि पाणीदार डोळ्यांच्या मीना कुमारी यांचा चाहता वर्ग खूप मोठा होता आणि आहे. त्यांचे चित्रपट पाहिले की त्यांच्या प्रेमातच रसिक पडत असत.
-
१९५० ते १९७० या कालावधीत मीना कुमारी यांनी बैजू बावरा, साहेब बिबी और गुलाम, पाकिजा या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी अक्षरशः वेडे होत असत.
-
मीना कुमारी यांचा अभिनय हा अभिनय वाटत नसे. त्या वास्तवदर्शी अभिनय करत. त्यामुळे त्यांचं दुःख पाहणाऱ्याला ते दुःख आपलंच वाटत असे.
-
मीना कुमारी यांच्या वडिलांचं नाव अली बख्श होतं. पाकिस्तानात ते संगीत शिक्षक होते. तसंच उर्दूतले मोठे शायरही ते होते.
-
मीना कुमारी यांचं आयुष्यही सुरुवातीला गरिबीत गेलं होतं. त्यांच्या घरी गरिबी असल्याने वयाच्या चौथ्या वर्षापासून त्या सिनेमांत काम करु लागल्या होत्या.
-
बेबी मीना या नावाने त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं होतं. लहान वयात काम करु लागल्याने त्यांना शिक्षणही पूर्ण करता आलं नाही. त्यांचं आयुष्यही एखाद्या ट्रॅजिडीपेक्षा कमी नव्हतं. त्यामुळे ट्रॅजिडी क्वीन हे त्यांना म्हटलं जात असे.. ते एका अर्थाने खरंच होतं.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”