-
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमधूम घराघरांत पोहोचलेली श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
-
श्वेता स्वतःचे वेगवेगळे हॉट आणि बोल्ड फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.
-
एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याची एकही संधी ती सोडत नाही.
-
४२ वर्षाच्या श्वेताला एक २५ वर्षांची मुलगी आहे. तिची मुलगी पलक ही सुद्धा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते.
-
श्वेता सध्या गोव्यामध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये श्वेताची मुलंदेखील दिसत आहेत.
-
गोव्यात श्वेताने प्रचंड धमाल केली आहे हे या फोटोजवरुन स्पष्ट होत आहे.
-
फार कॅज्यूअल लूकमध्ये श्वेता पुस्तक वाचताना दिसत आहे.
-
तिचा हा हॉट आणि बोल्ड अंदाज लोकांना प्रचंड आवडला आहे. आपले मित्र-मैत्रिणी व कुटुंबीय यांच्याबरोबर श्वेता धमाल करताना दिसत आहे.
-
स्विमिंग पूलमधीलही काही फोटोज तिने शेअर केले आहेत.
-
श्वेताचे खासकरून शॉर्ट्समधील फोटोज नेटकऱ्यांना पसंत पडले असून त्यांनी श्वेताच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं कॉमेंट सेक्शनमध्ये कौतुक केलं आहे.
-
“श्वेता आजही विशीतल्या तरुणीसारखी बोल्ड आणि मादक दिसत आहे.” अशीही कॉमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. सोशल मीडियावर श्वेताच्या या फोटोंची खूप चर्चा होत आहे. (फोटो सौजन्य : श्वेता तिवारी / इंस्टाग्राम पेज)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख