-
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत येत्या काही महिन्यांत विवाहबंधनात अडकणार आहे.
-
अनंत व त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग समारंभाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
-
अंबानी घराण्याची होणारी धाकटी सुनबाई नेमकी आहे तरी कोण? जाणून घेऊयात…
-
राधिका मर्चंटचा जन्म १८ डिसेंबर १९९४ रोजी मुंबईत झाला.
-
ती एनकोर हेल्थकेअरचे सीईओ विरेन आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे.
-
राधिकाने तिचं शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, इकोले मॉन्डिएल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केलं आहे.
-
त्यानंतर बीडी सोमानी आंतरराष्ट्रीय स्कूलमधून तिने डिप्लोमा पूर्ण केला.
-
राधिकाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार तिने राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयात २०१७ मध्ये पदवी संपादन केली आहे. सध्या, ती वडिलांच्या एनकोर हेल्थकेअरमध्ये संचालक म्हणून काम पाहते.
-
राधिका ही होणाऱ्या सासूबाई नीता अंबानी यांच्याप्रमाणे उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे. श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून तिने प्रशिक्षण घेतलं आहे.
-
२०२२ मध्ये पार पडलेल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये राधिकाने अरंगेत्रम हा नृत्यप्रकार सादर केला होता. या नृत्यात नर्तक विविध प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी हात आणि डोळ्यांच्या नजाकतीचा वापर करतात.
-
दरम्यान, गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता.
-
आता १ मार्च २०२४पासून अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. हे कार्यक्रम ३ मार्चपर्यंत चालणार आहेत. ( फोटो सौजन्य : radhikamerchant_ इन्स्टाग्राम )

Anaya Bangar: लिंगबदल केल्यानंतर क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीचा धक्कादायक दावा; अनाया बांगर म्हणाली, “क्रिकेटपटू मला नग्न फोटो…”