-
तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा साखरपुडा नुकताच पार पडला.
-
सिद्धार्थ-तितीक्षाने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.
-
दोघांच्या साखरपुड्याला नातेवाईक, कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
-
तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांनी २५ फेब्रुवारीला गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. दोघांनी समारंभातील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
तितीक्षाने या साखरपुड्यात फिकट जांभळ्या रंगाची ( लेव्हेंडर ) डिझाइनर साडी नेसली होती.
-
तसेच सिद्धार्थने साखरपुड्यात पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
तितीक्षाची साधी अन् सुंदर हिऱ्याची अंगठी सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.
-
साखरपुड्याच्या फोटोंना या जोडप्याने ‘Forever with my best friend’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, सध्या मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे इन्स्टाग्राम व Shutter Key Film )

२० फेब्रुवारी पंचांग: गुरुवारी गजानन महाराज १२ राशींना कसा देणार आशीर्वाद? तुमचा दिवस आनंदाने सुरु होणार का? वाचा राशिभविष्य