-
नटरंग सिनेमातल्या अप्सरा आली या गाण्यामुळे सोनाली कुलकर्णी ही घराघरांत पोहचली आहे. सोनालीने आज स्वतःचं वेगळं असं एक स्थान निर्माण केलंय (सर्व फोटो सौजन्य-सोनाली कुलकर्णी, इंस्टाग्राम अकाऊंट)
-
सोनाली सध्या एका दाक्षिणात्य सिनेमातही काम करते आहे. त्याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
सोनाली सोशल मीडियावर कायम तिचे खास फोटो पोस्ट करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते.
-
सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत तिने हिरकणी, मितवा, धुरळा, तमाशा लाईव्ह यांसारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत रसिकांची मनं जिंकली आहेत.
-
सोनालीला महाराष्ट्राची अप्सरा अशी ओळख मिळाली आहे ती अप्सरा आली या गाण्यामुळे.
-
महाराष्ट्राची अप्सरा अशी ओळख असलेल्या सोनालीच्या आयुष्यातही एक वाईट काळ आला होता. तिच्यावर आलेली ही वेळ इतकी वाईट होती की तिला सिनेसृष्टी सोडावी लागली असती. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने यावर भाष्य केलं आहे.
-
सोनाली म्हणाली की अशी वेळ आली होती तरीही मी एका गोष्टीचा काळजी घेतली की, मी माझी तत्त्व आणि विचार कुठेही मागे सोडणार नाही.
-
सोनाली म्हणाली, मी माझा वेगळा प्रवास सुरु केला. वेगळ्या मार्गाने स्ट्रगल सुरु केला. तेव्हा काही गोष्टींना नकार दिला होता, त्यामुळे मला ज्या चित्रपटांमध्ये काम करायचं होतं, त्या चित्रपटांमध्ये काम करता आलं नाही.
-
शेवटी मी स्वत:चा मार्ग शोधला. दिग्दर्शकांना भेटले, निर्मात्यांना भेटले. हिरकणी चित्रपटात मी आधी स्वत:चे पैसे गुंतवले. पण मी जर असं नसतं केलं तर मला सिनेसृष्टी सोडावी लागली असती, असं सोनालीने म्हटलं.
-
सोनाली म्हणाली, मी लोकांना नाही म्हणायला सुरुवात केली तेव्हा माझ्या आयुष्यातला एक वाईट काळ सुरु झाला होता. पण आज जेव्हा मी मागे वळून बघते की मी त्या गोष्टींसाठी हो म्हटलं असतं तर माझं इतकं नुकसान नसतं झालं. पण त्यावेळी मला तो चित्रपट करणं योग्य वाटलं नाही.
-
सोनाली ही तिच्या अप्सरा आली या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या अधिक पसंतीत उतरली. बेला शेंडेच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं हे गाणं सोनालीच्या नृत्यामुळेही प्रेक्षकांनी उचलून धरलं.
-
सोनालीचं जेव्हा स्ट्रगल सुरु होतं तेव्हा अप्सरा आली गाण्यावर नाच केल्याबद्दल तिलाच रॉयल्टी मागितली गेली होती असाही खुलासा तिने या मुलाखतीत केला आहे.
-
सोनालीने हिरकणी सिनेमात केलेल्या कामाचं कौतुक तर झालंच शिवाय आता ती एका दाक्षिणात्य सिनेमातही काम करते आहे. मोहनलाल यांच्यासह सोनाली झळकणार आहे.
-
सध्याच्या घडीला सोनाली कुलकर्णी ही मराठीतली टॉपची अभिनेत्री आहे. मात्र तिच्या स्ट्रगलबद्दल तिने मुलाखतीत तिचे काही अनुभव सांगितले आहेत.
