-
आशा भोसले यांच्या नातीचं नाव जनाई भोसले आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे ग्लॅमरस फोटो व्हायरल झाले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-जनाई भोसले, इंस्टाग्राम पेज)
-
जनाई ही आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे. ती उत्तम गायिकादेखील आहे.
-
जनाई भोसले ही अभिनेत्री श्रद्धा कपूरची चुलत बहीणही आहे.
-
जनाईच्या आईचं नाव अनुजा भोसले असं आहे. जनाई खूप छान गाणं गाते..
-
जनाई मुंबईतच लहानाची मोठी झाली. तिने बाप्पा मोरयासह इतर काही मराठी सिनेमांसाठी गाणी म्हटली आहेत.
-
जनाई भोसले गायिका तर आहेच शिवाय मुंबईतल्या हिल रोड भागात असलेल्या अॅपल स्टोरची मालकिणही आहे. वयाच्या २१ व्या वर्षी ती ही मोठी जबाबदारी सांभाळते आहे.
-
जनाई भोसले ही अनेकदा तिची आजी आणि प्रख्यात गायिका आशा भोसलेंसह कार्यक्रमांमध्ये दिसते.
-
जनाई भोसलेने चित्रपटांमध्ये काम करावं असं तिच्या चाहत्यांना वाटतं आहे. कदाचित ती बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करु शकते.

