-
बॉलीवूडमध्ये अनेक चर्चा रंगत असतात. कधी बॉलीवूड स्टार्सच्या चित्रपटांबद्दल तर कधी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल. (फोटो : तापसी पन्नू अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
सध्या बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींच्या लग्नाचा ट्रेंड सुरू आहे. नुकतंच रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्न बंधनात अडकले. त्यांच्यानंतर आता अभिनेत्री तापसी पन्नूच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. (फोटो : तापसी पन्नू अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
जाणून घेऊया अभिनेत्री तापसी पन्नूच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती आणि त्यांच्या डेटिंग लाइफ बद्दल. (फोटो : तापसी पन्नू अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
अभिनेत्री तापसी पन्नू आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बो गेल्या दहा वर्षांपासून डेट करत आहेत. (फोटो : मॅथियस बो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
मॅथियास बो हा एक डॅनिश बॅडमिंटनपटू आहे आणि २०१५ मध्ये त्याने युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. (फोटो : मॅथियस बो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
चीनच्या कुनशान येथे झालेल्या २०१६ थॉमस कपमध्ये डेन्मार्कच्या विजेत्या संघामध्येही मॅथियासचा सहभाग होता. (फोटो : मॅथियस बो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
आता तो भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा मुख्य दुहेरी प्रशिक्षक आहे. तापसी आणि मॅथियासची पहिली भेट २०१३ मध्ये इंडियन बॅडमिंटन लीगदरम्यान झाली होती. (फोटो : मॅथियस बो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
त्यावेळी मथियास बो हा लखनौच्या संघचा एक भाग होता आणि तापसी पन्नू चॅम्पियन हैदराबाद हॉटशॉट्सची ब्रँड ॲम्बेसेडर होती. (फोटो : मॅथियस बो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
२०१४ मध्ये जेव्हा मॅथियास इंडिया ओपनमध्ये खेळत होता तेव्हा देखील त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. नुकतंच राज शामानी यांच्या पॉडकास्टमध्ये तापसीने मॅथियास बो बरोबरच्या तिच्या दहा वर्षांच्या नात्याबद्दल सांगितले. (फोटो : मॅथियस बो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
राज शामानीच्या प्रश्नाचं उत्तर देत तापसी म्हणाली, “गेल्या १० वर्षांपासून मी मॅथियास बो या एकाच व्यक्तीसोबत आहे. मी १३ वर्षांपूर्वी अभिनयाला सुरुवात केली. जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत होते, तेव्हा मी त्याला भेटले आणि तेव्हापासून मी त्याच व्यक्तीसोबत आहे. या नात्यात मी खूप खूश आहे म्हणून त्याला सोडून दुसऱ्यासोबत राहण्याचा माझ्या मनात कोणताही विचार नाही.” (फोटो : तापसी पन्नू अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
सोशल मीडियावर मॅथियास आणि तापसी आपले अनेक फोटो पोस्ट करतात. (फोटो : मॅथियस बो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”