-
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा आह ३४ वा वाढदिवस. सध्या टायगर त्याच्या आगामी ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटात टायगर खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारसह दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे.
-
गेल्याचवर्षी आलेला टायगरचा ‘गणपत’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यामुळे प्रेक्षक आतुरतेने त्याच्या या आगामी चित्रपटाची वाट बघत आहेत.
-
टायगर श्रॉफबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे, पण टायगरला मार्शल आर्ट्स, जिम्नॅस्टिक आणि अॅक्शनमधला खरा टायगर बनवणाऱ्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
-
टायगर पडद्यावर जे भयानक स्टंट्स करतो, जी काही कर्तब दाखवतो त्यामागे एक नाव आहे ते म्हणजे विक्रम स्वाइन.
-
गेली कित्येक वर्षे विक्रम हा टायगरबरोबर काम करत आहे. तो त्याला जिम्नॅस्टिकचं ट्रेनिंग देतो शिवाय तो टायगरच्या फिटनेसकडेही लक्ष देतो.
-
परंतु विक्रमचाही हा प्रवास काही सोपा नव्हता, विक्रमदेखील एका अतिशय प्रतिकूल वातावरणातून वर आला आहे.
-
‘पिंकव्हीला’दिलेल्या मुलाखतीमध्ये विक्रमने स्पष्ट केलं की तो आणि त्याचा भाऊ हे अनाथालयात लहानाचे मोठे झाले. वयाच्या ९ व्या वर्षीच विक्रम एका बागेत माळी म्हणून काम करायचा ज्याचे त्याला महिन्याला ४०० रुपये मिळायचे.
-
एकदा त्याला कुणीतरी मुंबईत जाऊन काम करून पैसे कामावण्याचा सल्ला दिला, अन् ते स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला व नोकरी शोधू लागला.
-
याचदरम्यान त्याने गाड्या धुण्याचे काम सुरू केले अन् त्याची ओळख एका ड्रायवरशी झाली.
-
तो ड्रायवर त्याला जुहू बीच जवळ एकेदिवशी घेऊन गेला जिथे काही मुलं जिम्नॅस्टिकचं प्रशिक्षण घेत होते, ते पाहून विक्रमनेही तिथे सराव सुरू केला. कामातून वेळ मिळाला की विक्रम जिम्नॅस्टिकचा सराव करायचा अन् यात तो निपुण झाला.
-
एकेदिवशी जुहू बीचवर जिम्नॅस्टिकचा सराव करणाऱ्या विक्रमवर टायगर श्रॉफची नजर खिळली. त्यावेळी टायगर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयारी करत होता.
-
काही वेळ विक्रमबरोबर सराव केल्यानंतर टायगरने विक्रमला आपला ट्रेनर म्हणून नोकरी दिली. टायगरने विक्रमला एक नवा फोन, सीमकार्ड दिलं.
-
अगदी पहिल्या ‘हीरोपंती’पासून ‘बडे मियां छोटे मियां’पर्यंत विक्रमने टायगरची साथ सोडली नाही. टायगरच्या फिटनेसमागचं खरं श्रेय हे विक्रम स्वाइनलाच दिलं जातं. प्रत्येक चित्रपटासाठी विक्रमनेच टायगरला ट्रेन केलं आहे. विक्रम जर टायगरला वेळीच भेटला नसता तर टायगर इतका यशस्वी स्टार बनू शकला नसता असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति होणार नाही.
-
आता विक्रम हा टायगरच्या युनिटचाच एक अविभाज्य भाग आहे. टायगरच्या कोणत्याही सेटवर विक्रम हमखास असतोच. (फोटो सौजन्य : टायगर श्रॉफ / विक्रम स्वाइन इंस्टाग्राम पेज)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा