-
सुप्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर वयाच्या ५८व्या वर्षी एका गोंडस बाळाला जन्म देणार असल्याची आनंदीची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
या महिन्यात (मार्च) सिद्धू मुसेवालाच्या घरात पाळणार हलणार आहे. सिद्धूचे काका चमकौर सिंह यांनी या बातमीला दुजोरा दिला. तेव्हापासून सिद्धू मुसेवाला चर्चेत आला आहे. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
सिद्धू मुसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर गर्भवती राहिल्या आहेत. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणताही आधार नव्हता. म्हणून घराला वारस मिळण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी पुन्हा एकदा पालक होण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
सिद्धू मुसेवाला मागे कोट्यवधींची संपत्ती सोडून गेला आहे. या संपत्तीचा नवा वारस लवकरच येणार आहे. त्याआधी सिद्धू किती संपत्तीचा मालक आहे? हे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
सिद्धू मुसेवालाकडे अमाप संपत्ती असल्याचं म्हटलं जात आहे. सिद्धू हा फक्त देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय होता. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
‘जी वैगन’, ‘टोचन’, पंजाबी चित्रपट ‘डाकुआ दा मुंडा’, ‘डॉलर सॉन्ग’ आणि ‘जट्टा दा मुकाबला’ अशा सिद्धूच्या अनेक गाण्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तो प्रत्येक एका गाण्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत होता. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
सिद्धूच्या निधनानंतर नेटवर्थसंबंधित आलेल्या बातम्यांनुसार, तो १४ मिलियन म्हणजे ११४ कोटी रुपये मागे सोडून गेला आहे. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
सिद्धू एका लाइव्ह कॉन्सर्टसाठी २१ लाख रुपये मानधन घेतं असे. ऑस्ट्रेलियापासून ते अमेरिका आणि कॅनडापर्यंत त्याच्या कॉन्सर्टची मागणी होती. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
सिद्धूकडे आलिशान गाड्या होत्या. रेंज रोवर, इसुजू डी-मॅक्स, मर्सिडीज एएमजी 63, मस्टँग, फॉर्च्यूनर, जीप आणि टोयोटा यांसारख्या आलिशान गाड्या होत्या. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
याशिवाय सिद्धूला महागड्या बाइक्सची देखील खूप आवड होती. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)
-
पंजाब, कॅनडामध्ये सिद्धूचं आलिशान घर आहे. सिद्धूच्या निधनानंतर त्याच्या गाण्यातून जबरदस्त कमाई झाली आहे. (फोटो सौजन्य – सिद्धू मुसेवाला इन्स्टाग्राम)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा