-
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका-रणवीर आई-बाबा होणार आहेत.
-
गुडन्यूज दिल्यानंतर दीपिका आणि रणवीरने जामनगरला अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली होती.
-
या कार्यक्रमात दोघांनीही धमाल केल्याचं अनेक व्हायरल व्हिडीओजमध्ये पाहायला मिळालं.
-
दीपिकाने प्री-वेडिंग कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी खास लाल रंगाची बांधणी साडी नेसली होती.
-
बांधणी साडी, गळ्यात नेकलेस, केसात गजरा अशा पारंपरिक लूकमध्ये दीपिका फारच सुंदर दिसत आहे.
-
दीपिकाने या बांधणी साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
बायकोच्या फोटोंवर रणवीरने “…राहा ना मैं फिर अपने जैसा” या ‘लाल इश्क’ गाण्यातील काही ओळी लिहित खास कमेंट केली आहे.
-
दरम्यान, दीपिका पदुकोणच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री बाळाचं स्वागत करणार आहे. ( फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण इन्स्टाग्राम )

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”