-
गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी त्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामुळे खूप चर्चेत आहेत. १ मार्चपासून सुरू झालेला हा प्री-वेडिंग सोहळा ३ मार्चला संपला.
-
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हॉलीवूड, बॉलीवूडपासून उद्योग जगतातील आणि राजकारणी मंडळी उपस्थित राहिली होती. अजूनही या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत.
-
प्री-वेडिंग सोहळ्यादरम्यान अनंत अंबानींनी कमी केलेल्या वजनाविषयी बोललं जात आहे.
-
१८ महिन्यांमध्ये १०८ किलो वजन कमी करत अनंत यांनी काहीही अशक्य नसतं हे सिद्ध करू दाखवलं होतं.
-
अनंत अंबानींचं वजन २०८ किलो होतं. त्यांचं हे वजन का वाढलं? आणि त्यांनी कसं कमी केलं? जाणून घ्या…
-
२०१७मधील एका मुलाखतीमध्ये अनंत अंबानींची आई नीता अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत यांना दम्याचा आजार खूप गंभीर स्वरुपात होता.
-
दम्याच्या उपचारासाठी अनंत अंबानी बराच काळ स्टेरॉइड घेत होते. यामुळे त्यांचं वजन अधिकच वाढत गेलं.
-
अनंत यांना दम्यामुळे वजन कमी करताना खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या.
-
पण अनंत अंबानी यांनी योग्य आहार व नियमित व्यायामाच्या मदतीने १८ महिन्यात तब्बल १०८ किलो वजन कमी करून दाखवलं.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख