-
राज कपूर यांना हिंदी सिनेसृष्टीचा शोमॅन असं म्हटलं जातं. राज कपूर यांनी दिलेले चित्रपट हे अजरामर आहेत. आवारा, श्री ४२०, आह, इथपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास खूप मोठा आहे. (सर्व फोटो सौजन्य- @Rajsahaab Instagram)
-
राज कपूर यांना चित्रपटात येण्याचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं कारण त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे उत्तम अभिनेते होते.
-
राज कपूर हे दिसायला अत्यंत देखणे होते, राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर होत्या. मात्र एक काळ होता जेव्हा राज कपूर यांचं नाव नर्गिसशी जोडलं जाऊ लागलं. कारण या दोघांची जोडी पडद्यावर सुपरहिट ठरली होती.
-
ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकातही नर्गिस यांचा उल्लेख आहे. राज कपूर आणि नर्गिस यांचं जे नातं होतं त्यामुळे घरात कुणाला काही अडचण नव्हती असंही त्यात म्हटलं आहे.
-
मात्र राज कपूर यांच्या दुसऱ्या अफेअरमुळे कृष्णा कपूर वैतागल्या होत्या. त्या राज कपूर यांच्यावर इतक्या चिडल्या की त्यांनी घर सोडलं होतं. आम्ही आज तुम्हाला हाच किस्सा सांगणार आहोत.
-
नर्गिस आणि राज कपूर यांचं नातं संपुष्टात आल्यानंतर राज कपूर यांच्या आयुष्यात वैजयंती माला आल्या. गंगा जमुना आणि संगम या दोन चित्रपटांत दोघांनी बरोबर काम केलं होतं.
-
राज कपूर आणि वैजयंती माला यांच्यात नातं निर्माण झालं आहे, दोघांचं अफेअर आहे अशा चर्चा रंगू लागल्या. सेटवर या दोघांचं एकत्र असणं चर्चेचा विषय ठरला. हे सगळं जेव्हा कृष्णा कपूर यांच्या कानावर गेलं तेव्हा त्या चांगल्याच वैतागल्या आणि घर सोडून गेल्या असं खुल्लम खुल्ला या पुस्तकात म्हटलं आहे.
-
राज कपूर आणि वैजयंती माला यांच्यात नातं निर्माण झालं आहे, दोघांचं अफेअर आहे अशा चर्चा रंगू लागल्या. सेटवर या दोघांचं एकत्र असणं चर्चेचा विषय ठरला. हे सगळं जेव्हा कृष्णा कपूर यांच्या कानावर गेलं तेव्हा त्या चांगल्याच वैतागल्या आणि घर सोडून गेल्या असं खुल्लम खुल्ला या पुस्तकात म्हटलं आहे.
-
राज कपूर त्यांच्या खास वाद्य ओळखीसाठीही प्रसिद्ध आहेत.
-
नर्गिस आणि राज कपूर यांच्यातल्या नात्यावर कृष्णा कपूर यांनी मौन बाळगलं होतं. पण वैजयंती माला राज कपूर यांच्या आयुष्यात आल्यावर कृष्णा कपूर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. दोघांमधले मतभेद वाढले आणि कृष्णा कपूर घर सोडून गेल्या
-
मात्र काही दिवसांनी राज कपूर यांना त्यांची चूक समजली. त्यांनी मुंबईतल्या कृष्णा यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे माफी मागितली. तसंच आता आपण घरी जाऊ असं राज कपूर म्हणाले.
-
कृष्णा कपूर यांनी मुलांसह घरी येण्याची तयारी दर्शवली. पण वैजयंती माला बरोबर काम करायचं नाही ही अट राज कपूर यांना घातली. जी त्यांनी मान्य केली.
