-
अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडियावर सुपर अॅक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर.
-
मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळालेल्या अमृताने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे.
-
आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.
-
अमृताने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
अमृताने एका पिवळ्या साडीतील काही फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या ग्लॅमरस साडीत अमृताचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
-
ग्लॅमरस साडी आणि स्लीवलेस ब्लाऊजमध्ये अमृता अत्यंत मोहक दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज प्रचंड आवडला असून त्यांनी कॉमेंट करत तिच्या या लूकची प्रशंसा केली आहे.
-
एका युझरने तर अमृताची फिगर ही सर्वोत्तम असल्याची कॉमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. अमृताच्या या पिवळ्या साडीतील बोल्ड आणि ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा आहे.
-
अमृताच्या या मनमोहक अदांवर नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत. (सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर इंस्टाग्राम पेज)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”