-
बॉलिवूडमध्ये आपले अनेक लाडके कलाकार आहेत. आलिया भट्ट, करिश्मा कपूर, करीना, सलमान खान. पण तुम्हाला ठाऊक आहे का? यांचं शिक्षण किती झालं आहे? (फोटो-आलिया भट्ट फेसबुक पेज)
-
अभिनेत्री आलिया भट्टने १२ वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे त्यानंतर तिने सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने पुढचं शिक्षण घेतलेलं नाही. (फोटो सौजन्य-आलिया भट्ट फेसबुक पेज)
-
बॉलिवूडचा दबंग खान अशी ओळख असलेला नायक म्हणजे सलमान खान. सलमान खाननेही महाविद्यालयात प्रवेश घेतला पण शिक्षण पूर्ण केलेलं नाही. त्याने त्याचं महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलं आहे. (फोटो-सलमान खान, फेसबुक पेज)
-
अभिनेत्री कतरिना कैफ शाळेतच गेलेली नाही. कारण तिचं होम स्कूलिंग झालं आहे. सध्याच्या घडीला ती बॉलिवूडची सुपरस्टार आहे. (फोटो सौजन्य- कतरिना कैफ-फेसबुक पेज)
-
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेगनन्सीच्या बातमीमुळे चर्चेत आहे. दीपिकानेही एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र दीपिकानेही शिक्षण अर्धवट सोडलं आहे. (दोन फोटो सौजन्य-दीपिका पदुकोण, फेसबुक पेज)
-
दीपिका पदुकोणने सोशिओलॉजी विषयासाठी प्रवेश घेतला होता. पण तिने तिची डिग्री पूर्ण केली नाही. सिनेमात काम मिळाल्याने तिने शिक्षण अर्धवट सोडलं.
-
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान यानेही १२ वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंत तो सिनेमात काम करु लागला. (फोटो-आमिर खान, फेसबुक पेज)
-
अभिनेत्री काजोलने वयाच्या १६ व्या वर्षापासून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडलं (फोटो-काजोल, फेसबुक पेज)
-
अभिनेता अर्जून कपूर १२ वी नापास आहे. त्याने ही परीक्षा पास होण्यासाठी प्रयत्न केले पण तो पास झाला नाही. (फोटो-अर्जुन कपूर, फेसबुक पेज)
-
अभिनेता रणबीर कपूर याचं शिक्षणही दहावीपर्यंतच झालं आहे. दहावीनंतर रणबीरने फिल्म मेकिंगचा कोर्स केला आहे.
-
अभिनेत्री करीश्मा कपूर सहावीत नापास झाली होती. त्यानंतर तिने शाळा सोडली ती कायमचीच. (फोटो-करीश्मा कपूर, फेसबुक पेज)
-
अभिनेत्री कंगना रणौत ही बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. तिने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (फोटो कंगना फेसबुक पेज)
-
अभिनेत्री कंगना रणौत १२ वी नापास आहे. तिने तिचं शिक्षण नंतर पूर्णच केलं नाही. कारण ती मॉडेलिंग आणि अभिनय असं करु लागली होती.
-
अभिनेत्री करीना कपूर ही देखील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने वैविध्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम करत आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. (दोन्ही फोटो- करीना कपूर फेसबुक पेज)
-
करीना कपूरने कॉमर्सची डिग्री घेतली आहे. त्यानंतर तिने गर्व्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर हे महाविद्यालय तिने सोडलं.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”