-
मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी राधिका मर्चंटशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्यापूर्वी १ मार्च ते ३ मार्च दरम्यान अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
देश-विदेशातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत तीन दिवसांचा अनंत व राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामनगरमध्ये झाला. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाल. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. यानंतर स्वरांची उधळण झाली. प्रसिद्ध गायकांनी आपल्या सुमधूर आवाजाने पाहुण्यांना मंत्रमुग्ध केलं आणि नाचायलाही भाग पाडलं. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
या तीन दिवसांच्या सोहळ्यानंतर ६ मार्चला जामनगरमध्येच अंबानींनी खास रिलायन्स कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी देखील अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इन्स्टाग्राम)
-
६ मार्चच्या या कार्यक्रमात नीता अंबानी लाल रंगाच्या कांचीपुरम साडीत दिसल्या. (फोटो सौजन्य – नीता अंबानी फॅन पेज)
-
नीता अंबानींची ही सुंदर कांचीपुरम साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केली होती. (फोटो सौजन्य – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इन्स्टाग्राम)
-
कांचीपुरम साडीतला नीता अंबानींच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण नीता यांच्या या साडीवर लाडका लेक अनंत व होणारी सून राधिकाचं नाव आहे, हे तुम्हाला माहितीये का? (फोटो सौजन्य – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इन्स्टाग्राम)
-
नीता अंबानींच्या या लाल रंगाच्या साडीच्या किनारीवर अनंत व राधिकाच्या नावाचं पहिलं अक्षर ‘अR’ असं लिहिण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – नीता अंबानी फॅन पेज)
-
दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा जुलै महिन्यात असणार आहे. (फोटो सौजन्य – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इन्स्टाग्राम)
-
१२ जुलैला अनंत व राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. (फोटो सौजन्य – नीता अंबानी फॅन पेज)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”