-
अगदी कमी काळात बॉलिवूडमध्ये आपलं प्रस्थ करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अवनीत कौरचं नाव प्राधान्याने घेतलं जातं.
-
अवनीत कौर ही अवघ्या २२ वर्षांची आहे. गेल्या वर्षी तिचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला होता.
-
आपल्या पहिल्याच चित्रपटात अवनीत कौरने दिग्गज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर केली होती.
-
अवनीत कौरचे देशभरात लाखो चाहते आहेत. ती समाजमाध्यमांवर चांगलीच सक्रिय असते. अवघ्या २२ वर्षांच्या या अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर तब्बल ३२.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
-
आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच इन्स्टाग्रमावर वेगवेगळे फोटो अपलोड करते. यावेळी तिने गोव्यातील काही खास फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती एका बीचवर असल्याचं दिसतंय. आयुष्यातील काही क्षण निवांत घालवता यावेत म्हणून ती गोव्यात गेली असावी, असा अंदाज बांधला जातोय.
-
या फोटोंमध्ये ती मोकळे केस सोडून गोव्यातील निसर्गाचा आनंद घेताना दिसतेय.
-
तिच्या या फोटोंची सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा होत आहे.
-
अवघ्या चार तासांत या फोटोंना तब्बल २ लाख ३९ हजार लोकांना लाईक केलंय. तसंच या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी आतापर्यंत शेकडो कमेंट्स केल्यायत.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित